भुसावळ – वरणगाव आयुध निर्माण कारकान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अयुध निर्माण कारखान्यातील सेक्टर तीनमध्ये ट्रेसर विभागात आज दि.२२ रोजी ९.५० वा. हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही. या दुर्घटनेत नितीन पाटील, सचिन सपकाळे, गणेश धांडे हे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.














