वाढलेल्या वजन व पोटामुळे फिगरचे बारा वाजले असतील तर काळजी करण्याचे गरज नाही. या ४ टिप्स वर आपल्या दैनंदिन जीवनात वर्कआउट केल्यास तुम्ही स्लिम आणि स्मार्ट दिसाल…
१)जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवण्याची सवय असेल तर ही सवय मोडावी लागेल. आपला आहार 3 ते 4 भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकावेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा. याने पोटही भरलेलं राहील पोटाचा स्थूलपणा कमी होईल.
२). पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतात. याव्यतिरिक्त जर आपण गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायला तर आणखीच चांगले रिझल्ट बघायला मिळतील.
३) पहाटे पायी चालणे, जॉगिंग करणे किंवा व्यायाम करणे पोटातील चरबी कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहेत. याने हळुवार फॅट्स कमी होतील आणि पचनतंत्र सुरळीत होईल.
४) उशिरा जेवण करणे हे पोटातील चरबी वाढण्याचं प्रमुख कारण आहे. रात्री झोपण्याच्या 2 तासाआधी जेवून घ्यावं. किंवा रात्री काही लाइट आहार घ्यावा. याव्यतिरिक्त झोपण्याआधी शतपावली करा.















