लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव ( रिपोर्टर ईश्वर खरे )
येथे चैत्रशुद्ध चतुर्दशी शुक्रवार, 11.4.2025 रोजी जागृत खंडेरावाच्या नावाने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता सोनद नदी ते बाजारपेठ जवळ असणाऱ्या जागृत श्री खंडोबा महाराज मंदिरापर्यंत बारागाड्या | ओढल्या जाणार आहेत. तसेच त्या अगोदर
गावातून काठी मिरवणूक व खंडेराव भक्तांची सवाद्य मिरवणूक काढण्यातं येणार आहे. ही परंपरा गेल्या 50 वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे.
एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं
लोहारा येथील खंडेरावांचे परम भक्त कै. लोटू नारायण चौधरी यांनी 1975 या वर्षा पासून खंडोबाच्या नावाने चैत्रंशुद्ध चतुर्दशीच्या दिवशी बारा गाड्या ओढण्याची परंपरा सुरू केली होती. ती आजही अखंडितपणे चालू आहे. कै. लोटू नारायण चौधरी यांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ सुपुत्र कै. किशोर लोटू चौधरी यांनी जवळपास चार वर्षे बारा गाड्या ओढल्या,मात्र त्यांच्या अकस्मात निधनानंतर कै. लोटू नारायण चौधरी यांच्याच घराण्यातील मूळचे लोहारा ( जळगांव ) येथील रहिवाशी व हल्ली छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नोकरीनिमित्त वात्सव्यास असलेले पांडुरंग नथ्थु चौधरी यांचे सुपुत्र जितेश चौधरी हे बारा गाड्या ओढणार आहे.
यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी अनिल भगत, विकास भगत, महेश भगत (शेंदुर्णी), पांडुरंग चौधरी, विजय चौधरी, दिगंबर नथ्थु चौधरी, सुनील चौधरी, प्रमोद चौधरी, डॉ. प्रिंतेश चौधरी, अशोक चौधरी, गोकुळ चौधरी, (बापू ).प्रताप चौधरी, ईश्वर चौधरी, दिलीप चौधरी , दिनेश् चौधरी , प्रकाश चौधरी, उत्तम चौधरी, बापू भास्कर चौधरी, मनोज चौधरी, उखा भगत, तसेच पहुर येथील भगत मंडळी व समस्त पवार परिवाराचे सदस्य व इष्ट नातेवाईक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. भगत जितेश चौधरी हे बारागाड्या ओढणार आहेत. बारागाड्या ओढल्यानंतर रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल
जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…
उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!
१२वीनंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!
ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?
Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!