
पाचोरा, (प्रतिनिधी) – सद्यस्थितीमुळे कोरोना विषाणुचा प्राप्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व भारत बंद असुन फक्त अत्यावश्यक सेवा सुरु आहेत सगळे दुकाने बंद आहे.त्यामुळे सलुन कारागिरावर सुध्दा उपासमारीची वेळ आली आहे. या संकटात श्री रमेश जाधव अध्यक्ष संत सेना नाभिक समाज उपाध्यक्ष राजेन्द्र अहिरे सामाजिक कार्यकर्ता संदिप अहिरे राकेश अहिरे पप्पू सोनवणे आबा निकम यांनी उपविभागिय पोलिस अधिकारी तसेच प्रांत, पाचोरा तहसीलदार, पाचोरा पोलीस स्टेशन चे पी एस आय विकास पाटील यांना निवेदन दिले असून शासनाकडुन आम्हाला मदत मिळावी अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.















