जळगाव – केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी व अंत्योदय कार्डधारकांना एप्रिल मे जून या तीन महिन्याकरिता प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्यात आलेले असून हे धान्य स्वस्त धान्य दुकानदार मार्फत वितरित करण्यात आलेले असता स्वस्त धान्य दुकानदार यांना खर्चापोटी केंद्र शासनाकडून धान्याचे कमिशन मिळावे याकरिता केंद्रीय संघटना व राज्य संघटना यांनी मागणी केल्याप्रमाणे ही मागणी मंजूर करण्यात आली येऊन महाराष्ट्र शासनाला केंद्र शासना कडून निधी प्राप्त होऊन त्याबद्दल तसे केंद्र शासनाचे राज्य शासनाला आदेश पारित झालेले असून रास्त भाव दुकानदार यांना मार्जिन देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक राज्यांना निधी उपलब्ध झाला असून त्याचप्रमाणे आपले राज्याला सुद्धा केंद्र शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे व राज्य शासनाकडून तो निधी जिल्हा पातळीवर वर्ग करण्यात आलेला असून हा निधी जिल्हा पातळीवरून तालुका पातळीवर वर्ग करण्यात आलेला असल्याने यासंदर्भात सर्व रास्त भाव दुकानदार यांची ऑनलाईन वाटप माहिती तयार करण्यात येऊन सर्व दुकानदार यांची बँक खाते माहिती गोळा करण्यात येऊन बऱ्याच महिन्याचा कालावधी होऊनसुद्धा शासनाकडून निधी प्राप्त झाला असून सुद्धा दुकानदार यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणजेच कमिशन मिळायला दिरगाई होत असल्याने सदर कमिशन त्वरित मिळावे अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेकडून होत आहे तरी प्राप्त झालेला निधी जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानदार यांच्या बँक खाते मध्ये त्वरित जमा करणेकामी जिल्हाधिकारी साहेब तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी साहेब त्यांनी लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना त्वरित आदेश पारित करावे व तालुका पातळीवर निधी असून सुद्धा विलंब का होत आहे याकडे लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे