रेल्वेत भरती होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) नॉर्थ-सेंट्रल रेल्वेमध्ये 1600 हून अधिक रिक्त जागांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अप्रेंटिसशिपसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक उमेदवार rrcpryj.org वर नॉर्थ-सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि नोटिफिकेशन पाहून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पात्रता :
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 50% गुणांसह दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासह, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
अर्ज करण्याची वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे आहे. 01 डिसेंबर 2021 पर्यंतचे वय ग्राह्य धरले जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार अधिकच्या वयोमर्यादेत सूटही दिली जाईल.
अर्ज शुक्ल :
अर्ज करण्यासाठी, 100 रुपये अर्ज शुल्क देखील भरावे लागेल. आरक्षित प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली जाईल.
अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने
अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील ज्यांची शेवटची तारीख 01 डिसेंबर आहे. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. जी ट्रेडनिहाय 10 व्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणतीही माहिती उमेदवार नोटिफिकेशनमध्ये तपासू शकतो.
‘या’ आहेत महत्वाच्या तारखा…
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 02 नोव्हेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2021