
जळगाव, (प्रतिनिधी) – लॉक डाऊन च्या काळात रेड क्रॉस जळगावच्या वतीने ब्रँडेड औषधी सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे जळगावकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.रेड क्रॉस भवन मधील केदारनाथ मेडिकल स्टोअर्स च्या माध्यमातून ही विशेष सवलत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
केदारनाथ मेडिकल च्या माध्यमातून रेड क्रॉसद्वारा यापूर्वी देण्यात येत असलेली औषधी वरील सूट वाढवण्यात आली असून लॉक डाऊन च्या काळात ही सूट 15 ते 20 टक्के पर्यंत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जनरिक औषधी वर 35 ते 70 टक्क्यांपर्यंत ही सूट देण्यात येणार असल्याची माहिती रेडक्रॉस तर्फे देण्यात आली. सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात मध्यमवर्गीय आणि गरजवंत यांची निकड लक्षात घेऊन रेडक्रॉस ने हा भार सोसण्याचे ठरवले आहे. ब्रँडेड औषधे आणि जनरिक औषधे या दोघांवर सूट मिळणार असल्या कारणाने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. लोक डाऊन च्या काळातील या औषध सवलतीचा फायदा गरजूंनी घ्यावा असे आवाहन रेड क्रॉस या संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन सचिव विनोद बियाणी रक्तपेढी चेअरमन डॉ.प्रसन्न कुमार रेदासनी यांनी केले आहे.














