जळगाव- श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था व राष्ट्रीय आदिवासी संघटना जळगाव तसेच कोळी महासंघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधु-वर परिचय मेळावा दि.29 डिसेंबर 2019 रोजी सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बीएसएनएल ऑफिस मागे, जळगाव या ठिकाणी उत्साहात संपन्न झाला. त्यात जास्तीत जास्त वधु-वरांनी नाव नोंदणीत आणि परिचय देण्यात सहभाग नोंदविला होता. मेळाव्यात नोंदविण्यात आलेल्या वधु-वरांपैकी ज्यांचे फोटो, मोबाईल नंबर किंवा इतर माहिती अपूर्ण असल्यास त्यांनी खालील पत्त्यावर दि.15 जानेवारी 2020 पर्यंत संपर्क साधावा.
तसेच वधु-वरांची नोंदणी सुरु असून वधु-वर पुस्तिकेचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. तरी ज्यांना नाव नोंदणी करावयाची असेल त्यांनी उमेश बिल्डर अॅण्ड डेव्हल्पर्स, विसनगी नगर, डॉ.पराग चौधरी हॉस्पीटल शेजारी, जळगाव येथे जमा करावे किंवा 8208213048, 9420940291, 7020397575 या नंबर वर संपर्क साधावा. तरी दि.15 जानेवारी 2020 दुपारी 1 वाजेच्या आत समाज बांधवांनी आपल्या उपवर मुला-मुलींची नोंदणी करुन सदर संस्थेस सहकार्य करुन उपकृत करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री.मुकेशभाऊ सोनवणे यांनी केले आहे.














