मुंबई । येत्या १८ जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहेत. त्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. अशातच राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. राष्ट्र्पती पदाच्या शर्यतीत आपण राहणार नसून राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवारही असणार नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली असून विरोधकांमध्ये संयुक्त उमेदवार उभा करण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. दरम्यान काल राष्ट्रपतिपदाबाबत मुंबईत राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शरद पवार म्हणाले की, “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही. त्यामुळे मला गृहीत धरू नये, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
हे पण वाचा :
सोन्या-चांदीच्या दरात मोठा दिलासा, आज घटल्या किमती, जाणून घ्या ताजे दर
राज्यसभेसाठी पंकजा मुंडेंना उमेदवारी का दिली नाही? फडणवीसांनी केलं पहिल्यांदाच भाष्य
तरुणांसाठी खुशखबर.. येत्या 18 महिन्यात 10 लाख सरकारी नोकऱ्या; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने 18 जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया 21 जुलै रोजी पार पडणार आहार. महाराष्ट्रात मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे.
















