जळगाव – रोटरी क्लब जळगावतर्फे राष्ट्र उभारणीसाठी कार्यरत असलेल्या विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांचा मनपा आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांच्या हस्ते ‘नेशन बिल्डर अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी, मानद सचिव संदीप शर्मा, साक्षरता समिती प्रमुख प्रा. पूनम मानुधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात के.नारखेडे कॉलेज भुसावळचे उपप्राचार्य डॉ.अभय श्रीवास, नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील चित्रकला शिक्षक एन.ओ.चौधरी, का.ऊ.कोल्हे विद्यालयातील आरती भंगाळे, बालनिकेतन प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक डॉ.रविंद्र माळी, जिजामाता माध्यमिक विद्यालयातील संगीता पाटील, गुळवे मुलींचे विद्यालयातील कांचन नारखेडे, शारदा कॉलनीतील माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक विजय गिरनारे, श्रीराम माध्यमिक विद्यालयातील दिनेश पाटील, माध्यमिक विद्यालय, विटनेरचे मुख्याध्यापक प्रशांत गरुड, माध्यमिक विद्यालय धामणगांवचे मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे, मानवसेवा माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बारी समाज माध्य.विद्यालय शिरसोलीचे मुख्याध्यापक प्रमोद कोल्हे, या.दे.पाटील माध्य.विद्यालयाच्या हेमा अत्तरदे, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचे मिलन साळवी, अर्चना धुमे, बाहेती विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.एच.चौधरी, प्रमोद जाधव, जयहिंद विद्यालय कडगांवचे मुख्याध्यापक सुनिल चौधरी, जिजामाता प्राथ.विद्यालय,भुसावळ येथील प्रसन्न बोरोले, प्राथमिक विद्यालय महाबळच्या सायली डोळे, प्रगती विद्यामंदिरच्या भाग्यश्री तळेले, सिद्धीविनायक विद्यालयाचे अनिल माकडे आदिंचा सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लबमधील सदस्य असलेले व शिक्षण क्षेत्रात कर्यरत असलेले प्रा.डॉ.प्रज्ञा जंगले, प्रा.डॉ.शुभदा कुलकर्णी, प्रा.डॉ.शमा सराफ, प्रा. रंगलाल राठोड, प्रा.डॉ.श्रीरंग छापेकर, प्रा.सुरेश अत्तरदे, प्रा. डॉ.सतिष शिंदाडकर, प्रा.डॉ.तुषार फिरके, प्रा.डॉ.काजल फिरके आदिंचाही सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन दिपीका चांदोरकर यांनी केले. कार्यक्रमास रोटरी सदस्यांची लक्षणीय उपस्थिती, सन्मानित शिक्षकांच्या चेहर्यांवरील समाधान, आयुक्त डॉ.टेकाळे यांनी साधलेला संवाद, शिक्षकांनी रोटरी प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि रोटरी क्लबमधील कार्यरत शिक्षकांचा सन्मान ही या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली.