Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य मंडळाच्या शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार

Editorial Team by Editorial Team
April 19, 2023
in राज्य
0
मोठी बातमी! राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर ; शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्ट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत श्री.केसरकर यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा 26 एप्रिल पासून आणि दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्राचा नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यातही राबविला जाणार आहे. यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. यावर्षीपासून शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि सॉक्स हे शासनातर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास श्री.केसरकर यांनी व्यक्त केला.

येत्या वर्षापासून शाळांमध्ये ‘आजी आजोबा दिवस‘ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.केसरकर यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील अघोषित व घोषित विनाअनुदानित शाळांना अनुदान उपलब्ध करून देण्याचा तसेच त्रुटीपूर्ततेनंतर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अघोषित शाळांच्या नैसर्गिक तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदानासाठी पात्र घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. शिक्षक व सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली असून शिष्यवृत्तीच्या रकमेत देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. शाळांमध्ये इंटरॅक्टीव्ह टीव्ही लावले जाणार आहेत. आदर्श शाळांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत हे खरे नसून पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकांनो..! वाढत्या उष्णतेपासून अशी घ्या काळजी

Next Post

मुंबई येथे पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी ; लगेचच करा अर्ज

Related Posts

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
" Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?"

” Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?”

July 22, 2025
Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

July 22, 2025
Next Post
सेंट्रल GST अंतर्गत पुणे येथे 10वी पाससाठी भरती ; तब्बल 56,900 पगार मिळेल

मुंबई येथे पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी ; लगेचच करा अर्ज

ताज्या बातम्या

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya (25 July 2025) | आजचे राशीभविष्य

July 25, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025
Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

July 24, 2025
Load More
Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

Prafull Lodha Honeytrap : फोटोवरून राजकारण तापलं – खडसे यांचा महाजनांवर जोरदार हल्लाबोल

July 25, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya (25 July 2025) | आजचे राशीभविष्य

July 25, 2025
Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

Jio 601 Plan | जिओचा नवा धमाका – वर्षभर फ्री 5G डेटा!

July 24, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

Crime news:  अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नग्न व्हिडीओ काढले, पुन्हा पुन्हा ब्लॅकमेल करायचा नराधम

July 24, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us