Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच नंबर एक

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

najarkaid by najarkaid
November 6, 2023
in जळगाव
0
भाजपाची महाविजय -२०२४ अभियान संयोजन समिती घोषित ; ‘या’ नेत्यांची लागली वर्णी
ADVERTISEMENT

Spread the love

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत  दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालावरून २१० ग्रामपंचायती जिंकत भारतीय जनता पार्टीच नंबर एक चा पक्ष ठरला आहे, असे प्रतिपादन  भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केले. भाजपा प्रदेश मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. महायुती सरकारच्या विकास कार्यावर मतदार समाधानी असून मतदारांनी सरकारवर विश्वास दाखवत ७२३ पैकी तब्बल ४४१ ठिकाणी महायुतीला विजय मिळवून दिला असल्याचे श्री.उपाध्ये यांनी नमूद केले.

श्री. उपाध्ये म्हणाले की,वेळोवेळी विरोधकांकडून आणि विशेषकरून संजय राऊत यांच्याकडून “निवडणुका एकदा घेऊनच बघा मग चित्र स्पष्ट होईल” असे आव्हान दिले जात होते. राऊत यांच्यासारख्या नेत्यांना या निकालाने सणसणीत चपराक लगावली आहे. हाती आलेल्या ७२३ जागांच्या निकालांमध्ये भाजपा ला २१० जागी ,अजित पवार गटाला १२१ जागांवर तर शिंदे गटाला ११० जागांवर विजय प्राप्त झाला आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला ६५ ठिकाणी , कॉंग्रेसला ५१ ठिकाणी तर उद्धव टाकरे गटाला जेमतेम ३४ ठिकाणी यश मिळाल्याचे श्री. उपाध्ये यांनी सांगितले.राज्यात ‘महायुती’ ला महाविकास आघाडीपेक्षा तिप्पट जागी विजय मिळाला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा क्रमांक सर्वात शेवट लागल्याबद्दल श्री. उपाध्ये यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत खोचक टीका केली.

बारामती तालुक्यात सर्व जागी महायुतीला विजय मिळाला असून मोहोळ तालुक्यातही  भाजपाला १०० टक्के यश मिळाले आहे. कर्जत-जामखेड तालुक्यात रोहीत पवार यांना धक्का बसल्याचे तर जुन्नरमध्ये अमोल कोल्हे, वैभववाडी मध्ये वैभव नाईक यांना जनतेने स्पष्टपणे नाकारत धक्का दिला असल्याचे श्री. उपाध्ये म्हणाले. भाजपा हाच जनतेच्या मनातील पक्ष असून कुठल्याही स्तरावरची निवडणूक असो भाजपाच्या विकासकार्याला जनतेची पसंती मिळत असल्याचे श्री. उपाध्ये यांनी नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ITI उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी

Next Post

एसटीच्या ‘या’ युनिअननं पुकारला संप

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us