Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील साखर कामगारांची दिवाळी होणार गोड ; मिळेल इतका टक्के पगारवाढ

Editorial Team by Editorial Team
October 30, 2021
in राज्य
0
तुमच्यासोबतही ऑनलाइन फसवणूक झालीय? तर अशा प्रकारे पैसे येतील परत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई  : महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून 12 टक्के पगारवाढ करण्यात आली असल्याने राज्यातील सर्व साखर कामगारांची दिवाळी गोड झाली असल्याचे समाधान ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.

या निर्णयान्वये दिनांक 1 एप्रिल 2019 रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत 12 टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या 12 टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रूपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम-1983 अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार / कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे.

उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2019 पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना/हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी 26 रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा 308 रूपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आला आहे.

या शासन निर्णयाने कामगारांचे हित जपले असून सर्व कामगार आणि कारखान्यामधील कर्मचाऱ्यांना एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होणार असल्याचे कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तू जर माझी नाही झाली नाहीस तर.. तरुणीला भररस्त्यात अडवून तरुणाचं विकृत कृत्य

Next Post

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीत रेल्वेने उचलले ‘हे’ मोठे पाऊल, जाणून घ्या

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
खुशखबर…रेल्वेत 3366 पदांवर बंपर भरती, असा करा अर्ज

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! सणासुदीत रेल्वेने उचलले 'हे' मोठे पाऊल, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us