मुंबई : राज्यात येत्या काही दिवसांमध्ये अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मध्य भारतातील काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व विदर्भात अवकाळी पावसाचा धोका उद्भवला आहे. शुक्रवारी 11 फेब्रुवारीला साकोली, लाखांदूर, लाखनी आणि तुमसर या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे याच भागामध्ये अधिक पाऊस होण्याची भिती आहे.
हवामान खात्याने विदर्भातील भंडारा जिल्ह्यात येत्या 2 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच बुधवारी तुमसर इथंही पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी आणखी हवालदिल झाला आहे.
शेतकरी हवालदिल
शेतकऱ्याला कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. सरकारी अनास्था आणि निसर्गाचा बेभरोशीपणा यामुळे शेतकऱ्याची नेहमीच कोंडी होत आली आहे. त्यात आता या अवकाळीच्या अंदाजामुळे बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे.
हे देखील वाचा :
MPSC मार्फत “पोलीस उपनिरीक्षक” पदाच्या 250 जागांसाठी भरती
अखेर भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन मागे
.. आता पुढचा नंबर राऊत अन् परब यांचा”; किरीट सोमय्यांचा इशारा
‘या’ वेब सिरीजमध्ये अमिका शेलने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
पावरी गाण्यावर ‘या’ जोडीने केलेला डान्स पुन्हा पुन्हा पाहाल
















