मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात पक्षपातीपणाचा आरोप झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बदली होण्याची शक्यता आहे. केंद्रातील उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, कोश्यारींची बदली झाल्यास राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाऊ शकते.
कलराज मिश्र यांची २२ जुलै रोजी हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर ९ सप्टेंबरला त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या कलराज यांनी राज्य आणि केंद्रातही मंत्रिपद भूषवले आहे. उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.