Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक

najarkaid by najarkaid
November 14, 2019
in राज्य, राजकारण
0
राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार  बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच हा मोर्चा पोलिसांनी अडवला. कडू यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. 

परतीच्या पावसामुळं यंदा राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या अनेक भागांत पिके अक्षरश: वाहून गेली आहेत. मात्र, सत्ता स्थापनेच्या घोळामुळं प्रशासनाचं शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष झाल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या व्यथांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी आज राजभवनावर धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं. एरवी गनिमी काव्यानं व अचानक आंदोलन करणाऱ्या कडू यांनी यावेळी जाहीर आंदोलन केलं. त्यामुळं पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे हा मोर्चा राजभवनवर जाण्याआधीच अडवला गेला. त्यामुळं शेतकरी अधिकच आक्रमक झाले. सरकार नंतर स्थापन करा आणि आत्महत्येची वेळ आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्या, अशी मागणी शेतकरी करत होते. राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. तरुणांचा यात मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

राज्यपाल फक्त राजभवनात बसण्यासाठी आहेत का?

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी वेळ न दिल्याबद्दल शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यपाल हे राजकीय पक्षाचे आमदार व नेत्यांना भेटतात. शेतकऱ्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही. मग दाद मागायची कुठे?, राज्यात सरकार नाही. सर्व प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडं आहेत. ते शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे हातात का घ्यायची? ते फक्त राजभवनात बसण्यासाठी आहेत का,’ असा सवालही शेट्टी यांनी केला.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

राज्यपालांनी तात्काळ राज्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करावी

शेतकऱ्यांना तातडीनं २५ हजार रुपयांची मदत द्यावी

शेतकऱ्यांची सर्व देणी माफ करून टाकावी

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

Next Post

बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

बाळासाहेबांची शपथ घेऊन खोटं बोलणार नाही: संजय राऊत

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us