Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रमजान महिना संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

najarkaid live by najarkaid live
April 15, 2021
in राज्य
0
रमजान महिना संदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई दि. १५ :- राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत.

यावर्षी दि. १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता या वर्षी पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे.

त्यानुसार खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत
१. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

२. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क. सँनिटायझर इत्यादी) पालन करून पवित्र रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.

३. या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पुर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.

४. पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

५. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतु यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

६. पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

७. धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत;

८. कोविड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात १४४ कलम लागू असल्याने तसेच रात्रीची

संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

९. या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

१०.धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

११.पवित्र रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

१२.कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना संदर्भात आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यंत्रनेला दिले हे निर्देश

Next Post

जळगाव जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्या ५१९ व्यक्तींची पोलिस विभागाकडून तपासणी ; ४८ जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्या ५१९ व्यक्तींची पोलिस विभागाकडून तपासणी ; ४८ जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट

जळगाव जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्या ५१९ व्यक्तींची पोलिस विभागाकडून तपासणी ; ४८ जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us