Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
‘या’ ५ स्वस्त आणि मस्त बाइक्स देतात 90 Kmpl पर्यंत जबरदस्त मायलेज ; जाणून घ्या
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. इतिहासात पहिल्यांदा पेट्रोल १०० रुपये पार गेले आहे तर डीझेल शंभर रुपयाच्या दिशेने जात आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे दुचाकी चालकांच्या अडचणीत भर पडली आहे, कारण बाइकवरुन प्रवास करताना पेट्रोलसाठीच खिसा खाली होतोय. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखादी स्वस्त आणि दमदार मायलेज देणारी बाइक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारताच्या टू-व्हीलर मार्केटमध्ये अशा काही शानदार बाइक्स उपलब्ध आहेत. आज आपण सर्वाधिक मायलेज देणाऱ्या अशाच ५ बाइक्सबाबत जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया –

हीरो स्प्लेंडर प्लस

दिग्गज टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पची हीरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus) ही बाइक बेस्ट सेलिंग बाइक तर आहेच, शिवाय चांगल्या मायलेजसाठीही ही बाइक ओळखली जाते. हीरो स्प्लेंडर प्लस ऑटोमोटिव रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) प्रमाणित ८० किमी प्रति लीटर मायलेज देते. या मोटरसायकलमध्ये ९७.२ cc क्षमतेचं इंजिन असून हे इंजिन ८.०१ PS पॉवर आणि ८.०५ Nm टॉर्क जनरेट करतं. ही बाइक इलेक्ट्रिक आणि किक स्टार्ट दोन्ही व्हेरिअंटमध्ये आणि ४ आकर्षक कलर स्कीममध्ये येते. हीरो स्प्लेंडर प्लसच्या किक स्टार्ट ड्रम ब्रेक व्हेरिअंटची किंमत ६३,७५० रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) आहे.

हीरो सुपर स्प्लेंडर

हीरो मोटोकॉर्पचीच अजून एक बाइक या यादीमध्ये आहे. Hero Super Splendor (हीरो सुपर स्प्लेंडर) ही बाइक देखील कंपनीच्या लोकप्रिय बाइकपैकी असून टॉप 5 मायलेज बाइक्समध्ये सुपर स्प्लेंडरचं नावही येतं. ही १२५ cc क्षमतेची बाइक आहे. हीरो सुपर स्प्लेंडर बाइकचा ARAI प्रमाणित मायलेज ८३ किमी प्रति लिटर इतका आहे. १२५ सीसी बाइकसाठी हा जबरदस्त मायलेज असून हीरो सुपर स्प्लेंडर बाइकची किंमत ७२,६०० रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरू होते, तर प्रीमियम डिस्क ब्रेक व्हेरिअंटची किंमत ७५,९०० रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम, दिल्ली)जाते.

टीव्हीएस स्टार सिटी प्लस

टॉप 5 मायलेज बाइक्समध्ये टीव्हीएस मोटर्सच्या टीव्हीएस स्टार सिटी प्लस (TVS Star City Plus) ही बाइक एक चांगला पर्याय आहे. TVS Star City Plus बाइकचा ARAI प्रमाणित मायलेज ८६ किमी प्रति लिटर इतका आहे. ११० cc च्या टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाइकमध्ये ८ bhp पॉवर मिळते. ही बाइक किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट पर्यायासह सिंगल टोन आणि ड्युअल-टोन कलर स्कीममध्ये उपलब्ध आहे. टीव्हीएस स्टार सिटी प्लस बाइकची किंमत ६८,२४२ रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) आहे.

बजाज प्लॅटिना 100

आघाडीची टू-व्हीलर कंपनी बजाज ऑटोची बजाज प्लॅटिना 100 (Bajaj platina 100) ही बाइक कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देण्यासाठी ओळखली जाते. ही एक १०० cc बाइक असून ही ARAI प्रमाणित ८४ किमी प्रति लिटर इतका मायलेज देते. बजाज प्लॅटिनामध्ये १०१ cc क्षमतेचं इंजिन असून हे इंजिन ७.९ PS पॉवर आणि ८.३ Nm टॉर्क जनरेट करतं. 100 cc सेगमेंटमधील बाइक असूनही या बाइकमध्ये डिस्क ब्रेक दिला आहे. यासोबतच या बाइकमध्ये LED डीआरएल (डे-टाइम रनिंग लाइट्स) देखील आहे. बजाज प्लॅटिना 100 ची किंमत ६६,७३९ रुपयांपासून (एक्स-शोरुम, दिल्ली) सुरू होते.

बजाज ऑटोची Bajaj CT 100

देशातील सर्वात स्वस्त १०० cc मोटरसायकल म्हणजे बजाज ऑटोची Bajaj CT 100, ही सर्वात जास्त मायलेज देणारी बाइक देखील आहे. बजाजची ही एंट्री लेवल कम्यूटर बाइक ९० किमी प्रति लिटर मायलेज देते. या बाइकमध्ये १०२ cc इंजिन आहे. हे इंजिन ७.९ PS पॉवर आणि ८.३४ Nm टॉर्क जनरेट करतं. कंपनीची ही स्वस्त आणि दमदार मायलेज बाइक ब्लॅक, ग्रीन आणि रेड अशा तीन रंगात येते. Bajaj CT 100 बाइकच्या अलॉय व्हील्स किक स्टार्ट व्हेरिअंटची किंमत ५२,८३२ रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विलगीकरण कक्षातून साहित्याची चोरी करणारे तिघे जेरबंद

Next Post

श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

Related Posts

Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

Google Ad : वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

July 22, 2025
Married Woman Sex Relation Case

Husband Wife Recording Supreme Court : नवऱ्याने गुपचूप केलेली रेकॉर्डिंग कोर्टात चालते?

July 14, 2025
Next Post
श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

श्री ग गो बेंडाळे हायस्कुल चे अर्जुन सांळुके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

Jalsampada Vibhag Bharti 2025: महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!

July 27, 2025
Mumbai Pune Expressway Accident

Mumbai Pune Expressway Accident : कंटेनरची २० वाहनांना धडक ; ४ ठार, आरडाओरड, गोंधळ आणि रक्ताने माखलेली दृश्ये

July 26, 2025
धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

Sip mutual funds : गुंतवणूक म्हणजे काय? 500 रुपयांपासून सुरुवात करून करोडपती कसे व्हायचे?

July 26, 2025
Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

Blogging and YouTube Monetization Guide : ब्लॉगिंग व YouTube करून पैसे कसे कमवायचे?

July 26, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us