मुंबई: मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हा प्रवीण दरेकर यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
यापूर्वी सत्र न्यायालयाने प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांना अटकपूर्व जामीन नाकारला होता. मात्र, त्यांना अटकेपासून काही दिवस संरक्षण दिलं होतं. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. बोगस मजूर प्रकरणी सध्या प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात दरेकरांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे दरेकरांविरोधात चौकशी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरेकरांना 50 हजारांच्या मुचलक्यवर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.