अहमदनगर : शिवसेनेचे जुने कार्यकर्ते कोणत्याही पदाच्या अपेक्षेने काम करत नव्हते. बाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्य मानून शिवसैनिक काम करायचा. रड्या नावाचा कार्यकर्ता त्याकाळी नव्हता. आत्ताच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची गरज आहे. यावेळी आपल्या गावात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे भूत येवू नये यासाठी वेशीवर शिवसेनेचा बोर्ड लावा असा सल्ला शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मंत्री शंकरराव गडाख यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यात बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा तुफान फटकेबाजी केली आहे.
शिवसेना ही मुसलमान विरोधी नसून देशविरोधी भूमिका घेणारांच्या विरोधात आहे. शिवसेनेमुळं माझ्या सारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आज पुढं आलेत. तसेच सायकल चोरणारा मुख्यमंत्री झाला होता, असं म्हणत मतलब के लिए कुछ लोग बाप बदल लेते है, अशी घणाघाती टीका त्यांनी नारायण राणेंवरही केली आहे.















