न्यूयॉर्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबवल्याबद्दल बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचा प्रतिष्ठित ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार मिळाला आहे. फाउंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ’या पुरस्कार मी त्या भारतीयांना समर्पित करतो, ज्यांनी स्वच्छ भारत मिशनला एका जनआंदोलनात परावर्तित केलं आणि स्वच्छतेला आपल्या दैनंदिन जीवनात सर्वोच्च प्राधान्य द्यायची सुरुवात केली.’