Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मू.जे.महाविद्यालयात “नाम-रमण:२०२०” मध्ये नँनोटेक्नाँलोजी-संशोधकांची मांदियाळी 

najarkaid live by najarkaid live
February 28, 2020
in जळगाव
0
मू.जे.महाविद्यालयात “नाम-रमण:२०२०” मध्ये नँनोटेक्नाँलोजी-संशोधकांची मांदियाळी 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व मू.जे.महाविद्यालय्  यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ‘नँनोस्ट्रकच्र्र्ड अँड अमाँरफस मटेरिअल्स् : सिंथेसिस,कॅरँकटेरायझेशन अँड अप्लीकेशन’या विषयावरची राष्ट्रीय पातळीवरील “नाम-रमण:२०२०” ह्या परिषदेच उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाँ.पी.पी.माहुलीकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

या प्रसंगी प्रा.अशोक जोशी, अध्यक्ष,मायक्रोलीन एल्.एल्.सी.अमेरिका, सी-मेटचे माजी संचालक डाँ.डी.पी.अमळनेरकर ,उत्तर महारष्ट्रातील जेष्ठ संशोधक व के.सी.इ.सोसायटीचे सदस्य मा.प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रो.एम.ए.मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सं.ना.भारंबे, आयोजन सचिव डॉ.व्ही.आर.खडसे मंचावर उपस्थित होते. या परिषदेची प्रस्तावना संयोजक डॉ.के.बी.महाजन यांनी केली.सूत्रसंचालन प्रा.कविता पाटील व प्रा.भावना मानेकर यांनी केले.या प्रसंगी डॉ.माहुलीकर यांनी मुलभूत संशोधनात आपला देश मागे असल्याची खंत व्यक्त केली.प्राथमिक शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया असून उच्च शिक्षण हा संशोधनाचा पाया असल्याची त्यांनी आठवण करून दिली.मुलभूत शिक्षणात निष्णात शिक्षकांची उणीव भासत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात मा.प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांनी कृतीशील माणसांची संख्या कमी होत असल्याची खंत व्यक्त केली.कल्पनेचं उत्पादनात रुपांतर करण्यात आपण कोठेतरी मागे पडल्याचे स्पष्ट केले.आपले संशोधन उच्च प्रकारच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रा. अशोक जोशी यांचे एकुण १४७ पेटंट आहे.पेस मेकर मध्ये वापरली जाणारी बँटरी चे पेटंट स्वतःकडे असल्याचं सांगितले.प्रा. अशोक जोशी यांनी  नँनोटेक्नाँलोजी- नाविन्यपूर्ण शोध आणि यश या विषयावर बोलतांना म्हणाले कि एखादा अविष्कार करताना त्याची समाजासाठी उपयुक्तता बघून त्याची बाजारात मागणी किती आहे याचा अभ्यास महत्वाचा असल्याचे सांगितले.पुढे त्यांनी जखमेतील घाण काढण्यांसाठी पोर्टेबल व्हँकुम पंपची निर्मिती केल्याचं सांगितले.पुढे त्यांनी मायक्रोलीन एल्.एल्.सी.अमेरिका या कंपनीची विस्तृत माहिती दिली.या  कंपनीत द्रव पदार्थाचं वितरण व नियंत्रण करून नको ते पार्टिकलस काढन्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.असेच सुगंधाचे स्प्रे सध्या बाजारात उपलब्ध आहेत.याचा पाया जोशी सरांच्याच संशोधनाचा परिपाक आहे.  डाँ.डी.पी.अमळनेरकर यांनी आपल्या व्याखान्यात “सिल्क फ़ैब्रोइन बेस्ड् बायो नँनो कॉमपोझीटस”या आव्हानत्मक विषयावरमाहिती दिली. नँनोटेक्नाँलोजीला  आरोग्य सेवेत मोठी संधी असून अनेक उत्पादने सध्या बाजारात येऊ पाहत असल्याच त्यांनी सांगितले. या परिषदेसाठी संपूर्ण देशातून ६० शोधनिबंध प्राप्त झाले असूननँनोटेक्नाँलोजीच्या विवीध आयामांचा अभ्यासपूर्ण उल्लेख करण्यात आला.

डॉ.एम.ए.मोरे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी स्पेक्ट्रोस्कोपी या विषयावर विस्तृत व्याख्यान दिले. यामध्ये त्यांनी नँनोटेक्नाँलोजीमध्ये इलेकट्राँन मायक्रोस्कोपची कार्यतत्वे व उपयुक्तता यावर सखोल भाष्य केले.विवध मायक्रोस्कोपमध्ये संशोधन कसे कसे होत गेले हे त्यांनी विषद केले. परिषदेतील टेकनिकल सत्राचे  अध्यक्षपद डॉ.जे.व्ही.साळी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र यांनी भूषविले.या सत्रात मध्ये एकूण ३५  संशोधकांनी आपापली अभ्यासपूर्ण शोधनिबंधे सादर केली.  दि.२८ फेब्रुवारी या विज्ञान-दिवसाचे औचित्यसाधून मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  “रमण इफेक्ट”या विषयावर  विविध पोस्टर्स बनवून शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांना आदरांजली व्यक्त केली.या स्पर्धेसाठी डॉ.जे.व्ही.साळी ह्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.उत्कृष्ट पोस्टर्सला पारितोषिके देण्यात आली. शेवटी प्रा.प्रेमजीत जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी ‘फाइव्ह-डे विक’ला हायकोर्टात आव्हान

Next Post

कुसुम-लक्ष्मी मेमोरियल फाऊंडेशन व मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ” खान्देश सन्मान सोहळा २०२०

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कुसुम-लक्ष्मी मेमोरियल फाऊंडेशन व मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम ” खान्देश सन्मान सोहळा २०२०

कुसुम-लक्ष्मी मेमोरियल फाऊंडेशन व मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम " खान्देश सन्मान सोहळा २०२०

ताज्या बातम्या

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us