Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; राऊत पुन्हा सक्रिय

najarkaid live by najarkaid live
November 13, 2019
in राज्य, राजकारण
0
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; राऊत पुन्हा सक्रिय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-भाजपविरुद्ध एकहाती किल्ला लढवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आज यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डिस्चार्जआधी माध्यमांशी तितक्याच आक्रमकपणे संवाद साधत ‘महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार’, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडी केली म्हणजे धर्मांतर केलेले नाही, असा टोलाही त्यांनी टीकाकारांना लगावला. 

संजय राऊत यांना आज दुपारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे काही दिवस विश्रांती घेण्याचा व दगदग टाळण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. असं असलं तरी आक्रमक बाण्याचे राऊत लगेचच कॅमेऱ्यापुढे आले आणि त्यांनी भाजपवर नव्याने तोफ डागली. मुख्यमंत्रिपदाचा शब्द देऊनही तो शब्द भाजपने पाळला नाही. सर्वात मोठा पक्ष असून भाजपला सत्तास्थापनेत यश आलं नाही. नंतर स्वत:ला सरकार स्थापन करता येत नाही म्हणून त्यांनी इतरांनाही सरकार स्थापन करू दिलं नाही आणि त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप राऊत यांनी केला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार ही अफवा असल्याचे सांगत तशी शक्यता राऊत यांनी फेटाळून लावली.

शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पाठिंब्याची पत्रे सादर करू न शकल्याने शिवसेनेची संधी हुकली. त्याबाबत विचारले असता पत्रांबाबत थोडासा घोळ झाल्याने हे सगळं घडलं असं राऊत म्हणाले. त्याचवेळी येत्या काळात सगळं काही सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांकडून अन्याय झाला असे वाटते का, अशी विचारणा केली असता राज्यपालांकडून सर्वांवरच अन्याय झाला आहे, असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत. त्यादृष्टीने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहेत. ही आघाडी केली म्हणजे आम्ही धर्मांतर केले असे होत नाही, असा टोला लगावताना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गेले २० दिवस संजय राऊत दररोज भाजपवर हल्ला चढवत आहेत. पत्रकार परिषदांचा धडाका लावतानाच ते ट्विटरच्या माध्यमातूनही भाजपला लक्ष्य करत आहेत. ही मालिका त्यांनी रुग्णालयात असतानाही थांबवली नाही. आजही राऊत यांनी सूचक ट्विट केलं. ‘अग्नीपथ अग्नीपथ अग्नीपथ…’ असं ट्विट करत येत्या काळात आपली वाट खडतर असेल पण त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, असाच संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई, पुणे, ठाण्यात महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव

Next Post

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; सरन्यायाधीशांचं कार्यालय आरटीआय कक्षेत

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us