विणकर सेवा केंद्र मुंबई येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करावा.
या पदांसाठी होणार भरती
वेवर सर्व्हिस सेंटरमध्ये ज्युनिअर वेवेर (Junior Weaver) च्या ३, अटेंडंट (वेविंग) ची १ आणि अटेंडंट (प्रोसेसिंग) ची १ अशा एकूण ५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि पगार?
ज्युनिअर वेवर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २९,२०० ते ९२,३०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अटेंडंट (वेविंग) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अटेंडंट (प्रोसेसिंग) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी तसेच आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरातील कार्यालयामध्ये नोकरीसाठी नेमले जाईल.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उमेदवारांनी आपले अर्ज संचालक, वेवर्स सर्व्हिस सेंटर, १५-ए, मामा परमानंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
अर्जाची शेवटची तारीख : ३० जानेवारी २०२३ ही आहे.
उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.handlooms.nic.in वर सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
















