पारोळा – तालुक्यातील मुंदाणे येथील एका तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज परतफेडीच्या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.23) घडली. दिपक मधुकर पाटील (वय-32) असे या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
दीपक यांच्या शेतावर गेल्या काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातून ते कर्जबाजारी झाले. प्रपंच कसा चालवायचा व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत सापडलेल्या दीपक पाटील यांन आज विष पीले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात घेवून जात असतांना त्यांच्या रस्त्यातच मृत्यु झाला. याबाबत पोलिस पाटील, अशोक पाटिल, सुनिल पाटिल यांनी पारोळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. या घटनेचा पुढील तपास पो.कॉ. कैलास शिंदे करीत आहेत.