Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण

najarkaid by najarkaid
January 23, 2020
in राज्य, राजकारण
0
मा. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे  मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारी उपोषण
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे सोमवार, 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली.

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झाली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. या उपोषणात मा. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारमधील नेत्यांचा बहुतेक वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जात आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे या सरकारचे दुर्लक्ष होत आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली होती पण आता मात्र या विभागाच्या विकासाचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार आहे.

ते म्हणाले की, मराठवाड्याच्या हितासाठी भाजपाच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत – मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, मराठवाडा विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत, जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी आणि प्रभावीपणे राबवावी, महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावीत, मराठवाड्याची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी कोकणातून समुद्रात वाहून जाणारे 167 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी, जायकवाडी धरणात पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा, मराठवाड्याचा सिंचन अनुशेष आणि पाण्याची तूट भरून काढावी, या विभागाला देय असलेले अनुशेष अनुदान तातडीने द्यावे, फडणवीस सरकारने मंजूर केलेली औरंगाबाद शहराची 1680 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना तातडीने सुरू करावी व बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा.

या उपोषणाला भाजपाच्या मराठवाड्यातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात ९४ ब्लॅंकेट वाटप

Next Post

पो.नि.रवींद्र बागुल यांची बदली करा – अशोक तडवी यांची मागणी

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post

पो.नि.रवींद्र बागुल यांची बदली करा - अशोक तडवी यांची मागणी

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us