जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा संचालक नसतानाही या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या लेटरहेडवर खोट्या व बनावट मजकुराचे अर्ज करून, सह्या करून दस्तावेज तयार केल्याच्या आरोपाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विजय भास्कर पाटील (रा.दीक्षितवाडी, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश रणजित भोईटे (रा. भोईटेनगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव या शैक्षणिक संस्थेत अध्यक्ष किंवा संचालक नसतानाही या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तसेच संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून संस्थेच्या लेटरहेडवर खोट्या व बनावट मजकुराचे अर्ज करून, सह्या करून दस्तावेज तयार केल्याच्या आरोपाखाली जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नीलेश भोईटे यांनी फिर्याद दिली. संबंधित दस्तावेज बनावट असताना ते खरे भासवून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यालयात सादर केला असल्याचे म्हटले आहे. सहाय्यक निरीक्षक मीरा देशमुख तपास करीत आहेत.














