Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या

माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात माजी विद्यार्थ्यांनीही सहभागी व्हावे – मंत्री दीपक केसरकर

najarkaid live by najarkaid live
January 2, 2024
in राज्य
0
माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान ; संपूर्ण उदिष्ट,पारितोषिक,स्वरूप आणि नियम,अटी जाणून घ्या
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. 2 : राज्यात सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यातील सर्व शाळा सहभागी होत आहेत. याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन शाळांना मुख्यमंत्री स्वत: भेट देणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आपली शाळा – सुंदर शाळा ठरावी यासाठी या अभियानात माजी विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी या निमित्ताने केले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचे उद्घाटन 5 डिसेंबर 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मंत्री श्री.केसरकर यांनी आज आढावा घेतला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीप डांगे, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, सहसचिव इम्तियाज काझी, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहिले असून सुमारे दोन कोटी विद्यार्थी या पत्राचे आपल्या पालकांसमोर वाचन करणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक व्यवस्थेतून आलेल्या अनुभवांवर आधारित घोषवाक्य लिहून अपलोड केले जाणार आहे. यामधून प्रत्येक जिल्ह्यातून एका विद्यार्थ्यांची निवड करून विजेत्यांना मुंबई येथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असल्याचे मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी या अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. तर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा, वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील शाळा अशा तीन स्तरांवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.

अभियानाची उद्दिष्टे

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे; क्रीडा, आरोग्य, वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे; राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सवय मोडून काढणे; राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे; विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे; त्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन व्यक्तिमत्त्वाचे जडणघडण करणे तसेच शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांच्यात शाळेविषयी कृतज्ञतेची आणि उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप

अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना गुणांकन देण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन आणि त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी 60 गुण तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी 40 गुण देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रमांच्या आयोजनामध्ये शाळा व परिसराच्या सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसर स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन (देशी खेळांना प्राधान्य), त्याचबरोबर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम आणि त्यातील विविध घटकांच्या सहभागासाठी गुणांकन दिले जाणार आहे.

पारितोषिके

राज्यस्तरावर प्रथम क्रमांकासाठी वर्गवारी निहाय प्रत्येकी 51 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 21 लाख रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 11 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर देखील दोन्ही वर्गवारीमध्ये स्वतंत्ररित्या पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे बॅनर शहरात चर्चेचा विषय

Next Post

कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती

कुणबी प्रमाणपत्र तपासण्याचे ८५ टक्के काम पूर्ण; राज्य सरकारची माहिती

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us