- जिल्हाध्यक्षांच्या आदेशाने पाचोरा – भडगाव काँग्रेस निवडून आणण्यासाठी एकवटली

पाचोरा (प्रतिनिधी) राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची आघाडी झालेली असतांनाच पाचोरा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतांना दिसत नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता.मात्र काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष ऍड.संदीप पाटील यांच्या आदेशाने काँग्रेस पक्ष माजी आमदार दिलीप वाघ यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.यासंदर्भात नुकतीच पाचोरा-भडगाव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत बैठक संपन्न झाली.
काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत भाजपा शिवसेना यांचे विरोधात लढायचे असल्यास आपल्यातील किरकोळ मतभेद बाजूला सारून माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारासाठी एकदिलाने काम करण्याचा निश्चय करण्यात आला. याप्रसंगी उमेदवार दिलीप वाघ यांचे सह राष्ट्टवादी काँग्रेसचे रणजीत पाटील,प्रकाश भोसले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, शहराध्यक्ष ऍड अमजद पठाण,नंदकुमार सोनार,सरचिटणीस प्रताप पाटील,शेख इस्माईल शेख फकिरा,प्रा.शिवाजी पाटील,डीगंबर पाटील,राजेंद्र महाजन, विठ्ठल गुंजाळ,दिनकर पाटील,किरण पाटील,लक्ष्मण पाटील, शरीफ खाटीक,नंदकुमार मुळे,ऍड.मनीषा पवार,कुसुम पाटील,क्रांती पाटील,संगीता पाटील, आदिल पठाण,किशोर गरुड,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















