राजकीय हालचालींना वेग, बुधवार ठरला राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठींचा दिवस
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 12 दिवस उलटल्यानंरही सरकार स्थापनेचा पत्ता नाही. त्यातच बुधवारी यासंदर्भात अचानक राजकीय भेटी-गाठींना वेग आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. यानंतर काही वेळातच शिवसेना खासदार संजय राउत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकार स्थापित करणार नाही असे स्पष्ट केले. सोबतच, आपला पक्ष एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका बजावणार असे जाहीर केले. त्यातच काँग्रेसचे नेते हुसेन दलवई यांनी आता संजय राउत यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा केली.















