मुंबई : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. चार दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमुळे जनता महागाईने होरपळली आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली नव्हती. यानंतर गेल्या मंगळवारपासून तेलाच्या दरात वाढ होऊ लागली. दोन दिवस भाव वाढवल्यानंतर तेल कंपन्यांनी तिसर्या दिवशीही दरात वाढ केली नाही. आता चौथ्या दिवशी तिसऱ्यांदा तेलाच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे.
आयओसीएलच्या म्हणण्यानुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 112.51 रुपये आणि डिझेलची किंमत 96.70 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोल 107.18 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.22 रुपयांना विकले जात आहे. त्याच वेळी, चौथ्या महानगर चेन्नईमध्ये आज पेट्रोल 103.67 रुपये आणि डिझेल 93.71 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
















