10 पुस्तकांचे लेखन : कुलगुरूंच्या हस्ते पीएच . डी .प्राप्त
चाळीसगाव – माणसाने मनाशी ठरवले की मला यशस्वी व्हायचे तर जीवनात माणूस शंभर टक्के यशस्वी होतोच. याचे प्रत्यय चाळीसगाव महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय बाविस्कर यांच्या प्रेरणादायी कार्यातून निश्चितच अनुभवयास मिळतो.
डॉ. बाविस्कर यांचे लहान पण अतिशय गरिबीचे व हलाखीच्या परिस्थितीत गेले. कसे तरी शिक्षण घेऊन जीवनात एखादी नोकरी मिळाली तर आपले जीवन चांगले होईल. यासाठी जसा वेळ भेटेल तसा शालेय वेळेत अभ्यास केला. याकाळात मात्र शिक्षकांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. या प्रोत्साहनातून गरिबीची कधी लाज ही वाटली नाही. एक वेळेच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कधी त्यांनी हॉटेल वर कप बशी धुतल्यात तर कधी रोजंदारीने जे मिळेल ते काम केले. या कष्टाने पैशाचे महत्व व माणसाचे वागणुकीचे महत्व ही शिकवले. एवढेच नव्हे तर शिक्षण हे खरंच वाघिणीचे दूध असल्याचे स्वतःच्या अनुभवावरून सिद्ध झाले आहे, म्हणून ते म्हणतात शिक्षण हे आयुष्य बदलवत असते . असेच माझे ही आयुष्य फक्त शिक्षणाने बदलले असल्याचे ते नम्रतेने सांगतात.
नुकतेच त्यांना जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ द्वारे पीएच. डी. शिक्षण क्षेत्रातील मानाची पदवी कुलगुरू डॉ.श्री .पी. पी. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असल्याची भावना त्यांनी विशद केली. ते म्हणतात एक वेळ असे वाटायचे शिपाई झालो तरी जीवन सार्थक होईल, आज डॉक्टरेट ने सन्मानित झालो याच्या पेक्षा जीवनात अजून काय आनंदाचा क्षण असेल, असे ते आनंदाने सांगतात
प्रा.डॉ .बाविस्कर हे चाळीसगाव येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात असून त्यांनी “अ जीओग्राफिकल एपिडेमौलोजी अँड स्पाशियल पॅटर्नस ऑफ फूड सिस्टम अँड हेल्थ सर्विसेस इन द रूरल एरियास ऑफ द सदर्न पीडमोंट प्लेन इन द वेस्टर्न विदर्भ (महाराष्ट्र)” या विषयान्तर्गत पीएच. डी. प्राप्त केली.
या पीएच.डी.साठी त्यांना प्रा.डॉ.एस.एम. लवांदे यांचे मार्गदर्शन लाभले. एक चांगला अभ्यासक कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. लवांदे सर आहेत. त्यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे ते आवर्जून सांगतात.
डॉ. बाविस्कर यांनी एक दोन नव्हे तर चक्क दहा पुस्तकांचे लेखन करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संदर्भ साहित्य भूगोल विषयाचे निर्माण करून दिले. यातून त्यांचे विषयाचे ज्ञान व चिकाटी अनुभवायला मिळते. त्यांच्या पुस्तकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, कुलगुरू प्रा .डॉ. पी .पी . पाटील, यासह अनेक प्रतिष्टित मान्यवरांची प्रतिक्रिया मिळाली आहे. आगामी काळात असेच भूगोल विषयात चिरकाल टिकणारे कार्य करण्याचा संकल्प केला आहे.त्यांनी भारताची वन संपदा, पर्यटन भूगोल, पश्चिम भारताचा सांस्कृतिक आणि पर्यटन भूगोल, मध्य भारताचा सांस्कृतिक आणि पर्यटन भूगोल, भारताची खनिज संपदा, दक्षिण भारताचा सांस्कृतिक आणि पर्यटन भूगोल, उत्तर भारताचा सांस्कृतिक आणि पर्यटन भूगोल, औदयोगिक भूगोल, पर्यटन भूगोल संकल्पना व व्यवस्थापन, साधन संपदा भूगोल अश्या दहा पुस्तकांचे लेखन केले आहे.
त्यांचे शिक्षण एम. ए ., एम. फिल., पीएच .डी., नेट असे झाले आहे.त्यांनी 9 आंतरराष्ट्रीय व 24 राष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंधाचे वाचन, 26 शोध निबंध जर्नल मध्ये प्रकाशित , भारतीय दूरस्थ संवेदन संस्था, डेहराडून येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आजीव सदस्य डेक्कन जॉग्राफी सोसायटी पुणे, आजीव सदस्य युनियन ऑफ जॉईग्राफिक इन्फॉर्मेशन टेकनोलॉजिस्ट बेंगळुरू, आजीव सदस्य खानदेश भूगोलशास्त्र मंडल चोपडा,श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केल्यानंतर तेथे उत्कृष्ट शोध निबध म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
या त्यांच्या शैक्षणिक विकासात चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन मान. श्री. नारायण भाऊ अग्रवाल, सीनियर कॉलेज कमिटी चेअरमन डॉ . एम. बी. पाटील, संचालक डॉ . सुनील दादा राजपूत श्री .मु .रा .अमृतकर सर, श्री योगेश भाऊ अग्रवाल व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्या सायली मुठाने-पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रकाश बाविस्कर, उपप्राचार्य प्रा. अजय काटे, माजी उपप्राचार्य व भूगोल विभाग प्रमुख प्रा. दादासाहेब भाटेवाल,भूगोल अभ्यास मंडळ प्रमुख डॉ. व्ही. जे. पाटील ,माजी प्राचार्य डॉ. सु. सु. अलिझाड, श्री बापूराव बाविस्कर ,ज्ञानेश्वर बाविस्कर श्री .मिलिंद देव यांचे नियमित मार्गदर्शनातून त्यांची यशस्वी वाटचाल चालू आहे. असे प्रा. डॉ. बाविस्कर आवर्जून सांगतात.
ते चोपडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील माजी कर्मचारी श्री. रामचंद्र बाविस्कर व माजी नगरसेविका सौ. चंद्रभागाबाई बाविस्कर यांचे चिरंजीव आहेत.