वरणगावं (अंकुश गायकवाड) – तालुक्यातील रेशन धान्य वाटपासंदर्भात तालुक्यातील व भुसावळ शहरातील बरेच रेशनिंग कार्ड धारक भुसावळ तहसील मध्ये येऊन प्रशासनाकडे धान्य मिळत नसल्याबाबत या तक्रारी करत आहेत परंतु भुसावळ तहसील प्रशासन हे रेशनिंग कार्डधारकांच्या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष करून अनावश्यक कागदपत्रे जमा करायला लावून फार्म भरून घेत आहेत. यामुळे सोशल डिस्टनसिंगचा चांगलाच फज्ज़ा उडत आहे
याकरीता उद्या दिनांक 18 रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत सोशल डिस्टन्सच्या सर्व नियमांचे पालन करून आपल्या रेशन दुकाना जवळ बसलेल्या शिवसेनेच्या प्रतिनिधीकडे आपली तक्रार नोंदवावी , जेणें करून त्या लवकर सोडवण्याकरीता सहकार्य मिळेल असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी केले आहे .
लोक उन्हात ताटकळत उभे राहून रेशनचे धान्य मिळेल या आशेने लोक फार्म भरून देत आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता असा कुठलाच फॉर्म भरणे बाबत जिल्हास्तरावरून सुचित केले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या या महाभयंकर संकटात सोशल डीस्टसिंगच्या सर्व नियमांचा बोजबारा वाजला असून काही ज्येष्ठ नागरिकांसह महिला माता-भगिनी तासंतास लाइनीत उभे राहून अर्ज बनवून देण्याचा खटाटोप करीत आहेत.
आणि प्रशासन मात्र गरज नसताना अर्ज भरून घेत आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार येत्या मे महिन्यात केसरी कार्डधारकांना धान्यपुरवठा होणार आहे. तरी प्रशासनाने भुसावळ तहसीलने कामातील अनियमितता त्वरित दूर करून नागरिकांच्या अडचणी सोडवाव्यात ,रेशन कार्ड धारकांनी उद्या दिनांक 18 रोजी सकाळी आठ ते अकरा या वेळेत सोशल डिस्टन्स च्या सर्व नियमांचे पालन करून आपल्या रेशन दुकाना जवळ बसलेल्या शिवसेनेच्या प्रतिनिधीकडे आपली तक्रार नोंदवावी जेणेकरून त्या तक्रारी एकत्र करून प्रशासनाकडे दाद मागून आपल्या अडचणींचा निपटारा करणे सोपे होईल ,आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे ,आपल्या सर्व अडचणी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत शासन दरबारी पाठवून पाठपुरावा करून त्वरित सोडण्यात येतील. तसेच सर्व कार्डधारकांना शासकीय नियमाप्रमाणे पुरेसे धान्य मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील, त्यासाठी शिवसेनेचे भुसावळ तालुक्यातील सर्व पदाधिकारी शाखाप्रमुख व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत, असेही तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी कळवले आहे.














