
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी वरळी मतदार संघात “भावी मुख्यमंत्री” असा मजकूर असलेले बॅनर लावून राजकीय भूकंपच घडविला आहे.
विधानसभेच्या यशानंतर शिवसेनेनं सत्तेत समसमान वाटा पाहिजे, अशी भूमिका घेतली असतानाच, आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य यांच्या विजयानंतर त्यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले असून, ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळं आता सत्तेत समान वाटा दिला तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार की महाआघाडीचा पाठिंबा घेत सरकार स्थापन करून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी विराजमान करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.














