मुंबई, – बिहार विधानसभा आणि काही राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत यश मिळविल्याबद्दल बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव करण्यात आला. यावेळी भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, माजी खा. किरीट सोमैय्या, राज पुरोहित, अतुल शाह आणि कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.














