जळगाव, (प्रतिनिधी)- राष्ट्र पिता महात्मा गांधी व देशाचे लोकप्रिय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भा.ज.पा.जळगाव जिल्हा महानगर च्या वतीने दि. 2 ऑक्टोबर 2020 शुक्रवार रोजी सकाळी ८ वाजता गांधी उद्यान येथील राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. तसेच ८.३० वाजता शास्त्री टॉवर येथील लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून फुले मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हा अध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी व उपगतनेते राजेंद्र घुगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच भाजपा महानगरातील ९ मंडळांमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मध्ये शिवाजी नगर मंडल क्र.१ मधील शिवाजी नगर स्मशानभूमी (आर.वाय पार्क), वाल्मिक नगर मंडल क्र.२ मधील रथ चौक, अयोध्या नगर मंडल क्र ३ येथील कालिंका माता चौक, रिंगरोड परिसर मंडल क्र ४ नंदनवन कॉलनी, मंडल क्र ५ प्रिप्राळा स्मशानभूमी तसेच रामानंद नगर मंडल क्र ६ मधील हरिविठ्ठल नगर, झुलेलाल मंडल क्र ७ सिंधी कॉलनी सब्जी मंडी, मेहरूण मंडल क्र ८ मेहरूण स्मशानभूमी, महाबळ परिसर मंडल क्र ९ समता नगर ई.मंडळांमध्ये भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे, चंदन महाजन, राजू मराठे, प्रा.भगत सिंग निकम, महेश चौधरी, राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, अनिल जोशी, संजय विसपुते, प्रा.सचिन पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, उज्वला बेंडाळे, जितेंद्र मराठे, अक्षय चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, आघाडी अध्यक्ष लता बाविस्कर, जयेश भावसार, अशोक राठी, अक्षय जेजुरकर, दिनेश पुरोहित, ई. उपस्थित होते.