पाचोरा(प्रतिनिधी)- शहरातील व्यापारी हरी ओम मोर यांच्या घरात कपाटामध्ये ठेवलेले दहा लाख रुपये अज्ञाताने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. पाचोरा शहरातील रंगारगल्ली येथे राहणारे व्यापारी हरिओम मोर यांचे राहत्या घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने दिनांक १७ ऑक्टोबर रोजी भर दुपारी चक्क दहालाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
घटना घडल्यांनंतर घरमालकाने पोलिसात धाव घेत तक्रार दिली होती. दिनांक २९ ऑक्टोबर रोजी घरमालक श्री मोर यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरीच्या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.















