पाचोरा- भडगाव तालुक्यातील मौजे निंभोरा गावाजवळच्या जमिनीवर एमआयडीसी मंजुरी मिळाल्याचा आमदार किशोर पाटील यांनी केलेला दावा निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केला असून ही पोकळ घोषणा असल्याचा दावा माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला.
शासनाची ही केवळ अधिसूचना असून घोषणांचा पाऊस पाडणार्या उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची ही एक फसवी घोषणा असून प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होणे कठीण असल्याचा दावा माजी आमदार यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की ही केवळ अधिसूचना असून यावर हरकत नाहरकत सारख्या अनेक प्रक्रिया अजून बाकी असून याठिकाणी एमआयडीसीसाठी लागणारे पाणी पुरेसे उपलब्ध नसून कुठलीही अनुकूल भौतिक परिस्थिती औद्योगिक वसाहतीसाठी योग्य नाही. त्यामुळे आमदारांनी ही घोषणा म्हणजे केवळ नागरिक आणि तरुणांना दाखवलेले बोगस स्वप्न असून आमदारांनी त्यांच्या झालेल्या पूर्ण झालेल्या उद्घाटन करण्यासाठी बोलविण्याचे आमंत्रण प्रसारमाध्यमातून दिले होते जर 1 ऑक्टोबरपूर्वी त्यांनी कुठल्याही अशा पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करायला बोलावल्यास मी नक्की जाईन असाही उपरोधिक टोला माजी आमदार दिलीप वाघ यांनी मारला सिंचनासाठी 7 बॅरेजेस जरी पाच पूर्ण करू न शकणारे आमदार किंवा भडगाव येथील क्रीडासंकुलासाठी एक कोटी रुपये देखील उपलब्ध करू न शकणारे आमदार केवळ कोट्यवधीच्या विकासकामांचे खोटे दावे करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, गटनेते संजय वाघ, सतीश चौधरी, खलील देशमुख, रणजीत पाटील, दगाजीराव वाघ ,व्ही टी जोशी आदि उपस्थित होते.