Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग ; काँग्रेसचे सर्व आमदार देणार दोन कोटी रुपयाच्या जवळपास निधी ; मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी जमा करणार

najarkaid by najarkaid
April 29, 2021
in जळगाव
0
ब्रेकिंग ; काँग्रेसचे सर्व आमदार देणार दोन कोटी रुपयाच्या जवळपास निधी ; मुख्यमंत्री सहाय्यता फंडात निधी जमा करणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि. २९ : कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत शासनाने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास 2 कोटी रुपये, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रूपये आणि अमृत उद्योग समूह संगमनेरच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

रॉयलस्टोन निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले की, देशात आणि राज्यात कोरोना संकटाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. वेगवान पद्धतीने आणि वेळेत सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हाच कोरोनावरील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या निर्बंधामुळे उद्योग, व्यापारी आस्थापना बंद असल्याने अनेक राज्ये आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन राज्यातील 18 वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही ५ लक्ष रुपयांची मदत करणार
सरकारच्या या निर्णयाचे काँग्रेस पक्षाने स्वागत केले असून कोरोना विरोधी लढ्याला बळ देण्यासाठी आपल्या परीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री.थोरात पुढे म्हणाले की, राज्य सरकारने घेतलेल्या मोफत लसीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी हातभार म्हणून विधानसभा सदस्य म्हणून माझ्या एक वर्षाच्या वेतनाची आणि काँग्रेस पक्षाच्या विधानसभा आणि विधानपरिषेतील 53 आमदारांच्या एका महिन्याच्या वेतनाची अशी एकूण जवळपास 2 कोटी रुपयांची रक्कम, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 लक्ष रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
श्री. थोरात म्हणाले की, मी काही सहकारी संस्थांचे नेतृत्व करतो, अमृत उद्योग समुहातील या सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या खर्चाची रक्कम त्या सहकारी संस्था स्वीकारणार असून, त्यासाठी येणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात येणार आहे.

काही तरुण मंडळीही या विधायक कार्यात पुढाकार घेत आहेत. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी जे नागरिक लसीकरणाचा खर्च स्वतः उचलू शकतात त्यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी स्वतः आणि इतर पाच व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे, त्यांच्या या भूमिकेचे मी कौतुक करतो.

कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजन, औषधे, वैद्यकीय उपकरणे अशा विविध गोष्टींची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही मदत गरीब रूग्णांसाठी आवश्यक साम्रगी खरेदी करण्यासाठी उपयोगात येऊ शकते त्यामुळे राज्यातील इतर राजकीय पक्ष, सहकारी संस्था औद्योगिक आस्थापना यांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

Spread the love
Tags: #काँग्रेस
ADVERTISEMENT
Previous Post

बाहेर फिरत असलेलया गृह विलगीकरणातील रुग्णांवर होणार कारवाई

Next Post

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध वाढविले

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Next Post
यूपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी ‘या’ विद्यार्थ्यांकारिता शासनाची योजना

‘ब्रेक दि चेन’अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध वाढविले

ताज्या बातम्या

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us