
पाचोरा (प्रतिनिधी) कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांच्या प्रचारार्थ बाळद बु. येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी पीर बाबांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर गावातील मुख्य ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी गावातील विकासात आमदार अपयशी ठरले आहेत मतदार संघात उद्दोग नाहीत,तरुण मतदारा साठी पोलिस भरती नाही, गावात कोणतेच काम केलेले दिसुन येत नाही असे गावकर्यानी आपली संतंप्त भावना व्यक्त करीत होते. कापसाला हमी भाव 5500 शे आता कापूस 3500 ने घेतला जातो, बेरोगजारी, तरुणांना काम नाही,असे गावकर्यानीं आपले गर्हाणे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या कडे मांडली.परिवर्तन होणारच व उत्स्पुर्त पणे सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय माता बघिणी युवक पुरूष देत होते सभेसाठी गावातील आबालवृद्ध शेतकरी व्यापारी मजूर वर्ग उपस्थित होता. यावर उपस्थित विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, सामाजिक कार्यकर्ते खलील देशमुख, विनय जकातदार, गोपी पाटील, उपस्थित होते,
महिंद्र स्वामी महाराज मंदिरात नारळ फोडून व शहीद पोपट कमलाकर सोमवंशी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून गावात रॅली व बाळद बु. येथील मज्जित मज्जित व नवदुर्गा मित्र मंडळ आणि शारदा मित्र मंडळ, पाटील वाडा,सोमवंशी वाडा भीम नगर, संभाजी नगर, येथेे रॅली काढण्यात आली याप्रसंगी गावातील तरुण वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते
सुरेश जिजाबराव सोमवंशी, रविंद्र रामकीसन झंवर, विश्वनाथ लोटन सोमवंशी, दिलीप कृष्णा बागुल, शेख मग अब्दुल शेख, बालू विक्रम मोरे, श्रीरंग सारंग राव सोमवंशी, आबा बाजीराव पाटील, विलास ईश्वर मोरे, सागर दिलीप बागुल, विलास सुरेश पवार, दीपक रघुनाथ सोमवंशी, अंकुश ताराचंद सोमवंशी, शरद गोबा जाधव, भैय्यासाहेब दत्तू निकम, राहुल बापू पाटील, नितीन बाळू पाटील, अनिल धर्मराज मगर, शेख अकिल, राजू पठाण, पद्माकर बाविस्कर, प्रवीण पाटील,सागर पाटील, भूषण पाटील, समाधान मोरे,सुनील ठाकरे, मिलिंद राठोड, अवधूत दौलत मगर, सुरज रवींद्र झंवर, जितेंद्र सुरेश पवार, विकी नाना पाटील, सलीम शेख, जितु नाना संसारे, सुनील आत्माराम बिराडे कार्यकर्ते उपस्थित होते.















