जळगाव – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जळगाव, धुळे, नंदुरबार यांच्यामार्फत सन 2003-04 ते सन 2005-06 या वित्तीय वर्षात प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध संस्थांना मंजुरी देण्यात आलेली आहे. या मंजुरीनुसार ज्या प्रशिक्षण संस्थांची फी प्रलंबित आहे त्यांची फी अदा करण्याची कार्यवाही मुख्यालयामार्फत चालु आहे. आशा संस्थानी आपल्याकडील संपूर्ण कागदपत्रासंह जिल्हा कार्यालयास 30 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा. नंतर आलेल्या प्रस्ताव/मागणी/तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जळगांव यांनी कळविले आहे.















