Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फिरते लोक न्यायालयात प्रलंबित ३०,वादपूर्व १५५ केसेस निकाली तर १० लाखच्यावर वसुली

najarkaid by najarkaid
April 25, 2023
in जळगाव
0
फिरते लोक न्यायालयात प्रलंबित ३०,वादपूर्व १५५ केसेस निकाली तर १० लाखच्यावर वसुली
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- मा. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २३ एप्रिल रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

या लोकन्यायालयामध्ये संक्षिप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर प्रकरण, वैवाहिक प्रकरण, न्यायालयातील प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे असे दिवाणी व फौजदारी खटले असे प्रलंबित ३० तसेच वादपूर्व १५५ केसेस निकाली निघून १० लाख २५ हजार ९७० रुपयाची वसुली झाली.

यावेळी पॅनल प्रमुख जी. बी. औंधकर, पंच न्यायाधीश म्हणून अॅड. गोपाळ पाटील यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनच्या प्रांगणात करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश मंगला जी. हिवराळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, वकील मंचाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे हे मंचावर उपस्थित होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रवीण पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये लोकन्यायालयाचे महत्त्व स्पष्ट केले.

तसेच यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरात अॅड. एस. पी. पाटील यांनी मादक पदार्थ बळी धोका व निर्मूलन या विषयावर विस्तृत विचार मांडले तसेच अॅड. सुनील पाटील यांनी गर्भनिदान जाणीव या विषयावर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा यावर गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय भाषण करतांना दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच यामुळे आपला वेळ, पैसा, नाती हे कसे जिवंत राहतात हे सांगून पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, ३० एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकन्यायालयात वादातीत व वादपूर्ण प्रकरणे तडजोडीने सोडवणे करता जास्तीत जास्त प्रकरण घेऊन सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा‌ असे आवाहन केले.

यावेळी अॅड. डी. जी. पाटील, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. बापू महाजन, अॅड. एम. के. मोरे, अॅड. राजेंद्र परदेशी, अॅड. अरुण भोई, ॲड. अनिल पाटील, अॅड. निलेश सूर्यवंशी, अॅड. पी. बी. पाटील, अॅड. रनसिंग राजपूत, अॅड. अनुराग काटकर, अॅड. शांतीलाल सैंदाने, ॲड.कविता किशोर रायसाकडा (मासरे). ॲड. भाग्यश्री महाजन, अॅड. माधुरी जाधव, अॅड. ज्योती पाटील, अॅड. एन. एस. महाजन, अॅड. अविनाश सुतार, अॅड. डी. पी. पाटील, अॅड. नरेंद्र डकोरकर, अॅड. कैलास सोनवणे, अॅड. संदीप पाटील, अॅड. रवींद्र पाटील, अॅड. चंदन राजपूत, अॅड. प्रशांत नागणे, अॅड. प्रशांत भावसार, अॅड. गोसावी, अॅड. लक्ष्मीकांत परदेशी, अॅड. ईश्वर जाधव अॅड. चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच ग्रामसेवक परदेशी, पोलीस कर्मचारी राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, रणजीत पाटील, न्यायालयीन कर्मचारी जी. आर. पवार, संजीव ठाकरे, दीपक तायडे, विजय पवार, अमोल चौधरी, ईश्वर पाटील, नितीन पाटील, सर्व वकील संघ सदस्य, न्यायालयीन कर्मचारी यांनी फिरते लोक न्यायालय (मोबाईल व्हॅन) यशस्वी साठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार अॅड. संजीव नैनाव यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आनंदाची बातमी! शिक्षकांसाठी धावणार ‘ही’ स्पेशन रेल्वे गाडी, भुसावळला असेल थांबा

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.. विविध पदांसाठी मोठी भरती

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us