भडगाव – येथील नगरपरिषदेच्या वतीने आज सभागृहात स्प्लाॅस्टीक बंदिबाबत शहरातील व्यापार्याची बैठक आयोजित केली होती. बैठकीत व्यापार्यानी कॅरीबॅग वापरू नये अशा सुचना मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी व्यापार्यानां दिल्या. तर बंदि असलेले प्लाॅस्टीक वापराताना कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
आज दुपारी बारा वाजता नगरपरीषदेच्या सभागृहात व्यापार्याच्यां बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी बैठकीत सुचना केल्या की, व्यापार्यानी बंदि असलेले प्लाॅस्टीक कॅरीबॅग व अन्य म साहीत्याचा वापर करू नये. कापडी पिशव्याचा वापर करावा. पालिकेच्या वतीने प्लाॅस्टीक कॅरीबॅग तपासणण्यासाठी पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे पथकाला कोणी बंदि असलेले प्लाॅस्टीक वापरतांना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे संकेत त्यांनी दिले. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व्यापार्यानी कापडी पिशव्याचा वापर करून पालिकेच्या प्लाॅस्टीक बंदि मोहीमेला हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले. दरम्यान यावेळी उपस्थिती व्यापार्याना नगरपरीषदेच्या वतीने कापडी पिशव्या भेट देण्यात आल्या. बैठकीला शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील व्हयापारी बंधूंनी बंद असलेले प्लाॅस्टीक वापरू नये. तर शरहवासीयांनी व्यापार्याकडे कॅरीबॅगचा आग्रह धरू नये. कापडी पिशव्याचा वापर करून शहर स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हावे.
– विकास नवाळे, मुख्याधिकारी भडगाव