पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मा.ना.गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव यांच्या आदेशानुसार व आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या शिफारसीने आणि रावसाहेब मनोहर पाटील जि.प.सदस्य, यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेले असून सदर कामाची प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे. यामुळे नगरदेवळा परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
नगरदेवळा हे तालुक्यातील मोठ्या जनसंख्येचे तसेच बाजार पेठेचे शहर आहे. २४ ते २५ खेड्यांचा परिसर लागून आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या निर्माणमुळे गरजू गोरगरीब रुग्नांची उत्तम सोय होईल. वेळ व पैसा वाचेल. वेळेवर औषोधोपचार त्यामुळे परिसरातील नागरिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अभिनंदन देखील करीत आहे.














