Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

najarkaid live by najarkaid live
June 19, 2020
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, दि १९ : कोरोनाशी आपण ३ महिन्यांपासून लढतो आहोत. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग आपण चांगल्या पद्धतीने रोखला असला तरी मृत्यूदर वाढणे बरोबर नाही. आपण लॉकडाऊन शिथिल केला आहे त्यामुळे रुग्णांच्या संख्येत काही जिल्ह्यांत वाढ होत आहे. रुग्ण शोधणे आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क जलदरित्या शोधणे हा एकमेव मार्ग आहे, या कामांत अजिबात ढिलाई नको असे सांगतांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील तज्ज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स नेमावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

ते आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांच्याकडून कोरोना परिस्थितीचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील सहभागी झाले होते.

मुंबई येथे डॉक्टर्सचा टास्क फोर्स आपण स्थापन केला त्याचा चांगला उपयोग झाला. आता प्रत्येक जिल्ह्यात किंवा विभागात असा टास्क फोर्स करणे गरजेचे झाले आहे कारण रुग्ण संख्या वाढत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, यामध्ये तेथील जुने जाणते, तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि त्यांचा मुंबईच्या डॉक्टर्सशी देखील कायम संपर्क असावा. आरोग्य मंत्रालयाकडून उपचार पद्धती, औषधी याबाबत विविध सूचना येत असतात, त्यात बदलही होत असतात त्यादृष्टीने वरिष्ठ डॉक्टर्सचा सहभाग वाढवणे महत्वाचे आहे. वेळेत औषधे मिळाली तर रुग्ण बरे होत आहेत हे कितीतरी प्रकरणात सिध्द झाले आहे. आपले रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप चांगले आहे. प्रयोगशाळांमधून चाचणीचे अहवाल आता लगेच मिळायला पाहिजेत अशा सुचना असतांना काही ठिकाणी ७२ तास लागत असतील तर ती गंभीर बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगून कोणत्याही परिस्थितीत ढिलाई झाली नाही पाहिजे असे सांगितले.

ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगच्या बाबतीत केंद्राने आणि राज्याने व्यवस्थित मार्गदर्शिका दिल्या आहेत त्याप्रमाणे झालेच पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही ठिकाणी वरिष्ठ डॉक्टर्स हे आपले वय आणि इतर आजार असल्याने कोविड रुग्णांना तपासत नाहीत,कनिष्ट डॉक्टर्स कोविड जबाबदारी सांभाळत आहेत असे निदर्शनास आले आहे. या वरिष्ठ डॉक्टर्सनी थेट कोविड उपचार करायचे नसतील तर रुग्णालयांत उपस्थित राहून इतर डॉक्टर्सना मार्गदर्शन करू शकतात किंवा संगणक ,स्मार्ट फोन कॅमेरा या माध्यमातून स्वत:ला सुरक्षित ठेवून उपचारांचे मार्गदर्शन  करणे सहज शक्य आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अधिक गतीने रुग्णांचे संपर्क शोधणे गरजेचे आहे असे सांगितले. आता पावसाला सुरुवात झाली असून इतर रोगांमध्येही वाढ होऊ शकते अशा वेळी नॉन कोविड रुग्णांना त्वरित उपचार मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणले. जिल्ह्यांमध्ये इंडियन  मेडिकलब असोसिएशनच्या डॉक्टर्सची देखील टास्क फोर्समध्ये मदत घ्यावी असेही सांगितले.

मीरा भाईंदर, पुणे ,पिंपरी चिंचवड, नाशिक, धुळे, लातूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्ह्यांचा व महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा आढावा घेण्यात आला.

प्रारंभी प्रधान सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांनी रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस २१.३ वरून २३.१ झाले आहेत, रिकव्हरी रेट ५०.४ असून देशाचा रिकव्हरी रेट ५३.८ इतका तसेच मृत्यू दर ३.७ वरून ४.८ टक्के झाल्याची माहिती दिली.रुग्णांच्या माहितीचे सुयोग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असून नियमित समायोजन करावे व माहिती अद्ययावत करीत राहावी असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. जिथे प्रत्येक रुग्णांचे १० पेक्षा कमी संपर्क  शोधण्यात येतात तिथे संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळल्याचे ते म्हणाले. एखाद्या इमारतीत एखाद्या अपार्टमेंटमध्ये कोविड रुग्ण आढळल्यास त्या इमारतीवर दररोज लक्ष ठेवून तेथील रहिवाशांच्या तब्येतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे तसेच किमान फोनवरून तरी चौकशी करीत राहणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत क्रीडा प्रवर्गातून निखिल पाटील राज्यात प्रथम!

Next Post

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञानाचा वापर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी ‘टेलीआयसीयु’ तंत्रज्ञानाचा वापर

ताज्या बातम्या

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

February 25, 2026
Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Load More

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us