Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रत्येक गावांत कोरोना दक्षता समिती नेमण्याचा पालकमंत्र्यांचा मानस

najarkaid by najarkaid
July 24, 2020
in जळगाव
0
प्रत्येक गावांत कोरोना दक्षता समिती नेमण्याचा पालकमंत्र्यांचा मानस
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव, दि. 24 – कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत:कडे व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोना दक्षता समिती नेमण्याचा मानस आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरीकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे रुग्णालय बनविण्याचा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

येथील वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण व वातानुकुलीत 30 खाटांचे आयसीयू बेडच्या अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर भारती सोनवणे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजित राउत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांचेसह महाविद्यालयातील डॉक्टर, अधिपरिचारिका व इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, 30 खाटांचा अतिदक्षता विभाग व प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्या ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार माणून कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वजण कोरोना योध्दाची भूमिका बजावत आहात याबद्दलही त्यांनी सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद दिले. कोरोनाला हरवायचे असेल तर यापुढील काळात प्रत्येक नागरीकाने स्वयंशिस्त पाळली पाहिजे. हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

कोरोनापूर्वीच्या काळात सामान्य रुग्णालयात 12 व्हेटीलेटर होते. आता याची संख्या 71 इतकी झाली आहे. ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध नव्हते. परंतु आता 311 बेड ऑक्सिजनयुक्त झाले आहे. यात 30 बेड वातानुकुलीत आहेत. गॅस पाईपलाईनद्वारे 311 बेड ऑक्सिजनयुक्त करण्यात आले आहे याकरीता 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासन तसेच सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींच्या मदतीतून 50 बेड ऑक्सिजयुक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात होताच 7 एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीत जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरु करण्याची मागणी केली. त्यास मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाने आठ दिवसात मान्यता दिली. पुढील आठच दिवसात प्रयोगशाळेच्या बांधकामासाठी व बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला व त्यानंतर इतर कामांसाठी 18 लाख रुपये मंजूर केले. याप्रमाणे प्रयोगशाळेसाठी 78 लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून खर्च करण्यात आला आहे. या प्रयोगशाळेमध्ये पूर्वी 160 नमुने तपासण्यात येत होते. आता एक मशीन वाढविण्यात आल्याने दररोज 300 नमुने तपासण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज २४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा–शालिग्राम मालकर

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

शासनाने मागासवर्गीय महामंडळांना निधी उपलब्ध करून द्यावा--शालिग्राम मालकर

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us