मुंबई दि. २९ : आज राजकारणात तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी उभी राहिली आहे. लोकसभेतील मते पाहता विधानसभेत युती सरकार ला टक्कर जर कुणी देऊ शकेल तर तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. आज जनतेचा कौल बघता बीजेपीने देखील वंचित बहुजन आघाडीची धास्ती घेतली असून आगामी विधानसभेत राजकारणातील समीकरणे निश्चितच बदलतील. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले, त्यात त्यांनी सांगितले कि, वंचित बहुजन आघाडी ज्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा समूहांना एकत्र घेऊन संघटन बांधते. त्यामुळे ज्यांना आजपर्यंत समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली नाही आणि जे वंचित घटक आहेत अशांना केंद्रस्थानी आणण्याचा हेतू वंचित बहुजन आघाडीचा आहे. ज्यांना आजपर्यंत फक्त मतदार म्हणून वापरण्यात आले आणि प्रतिनिधित्व त्याच्याकडे देण्यात आले नाही अशा सर्वांना ज्यांना ज्यांना आमचा हा विचार पटतोय त्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला वेळेचे, बुद्धीचे आणि त्याचबरोबर आर्थिक निधीचेही मदत द्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने क्राउड फंडिंगसाठी ourdemocracy.in हि संस्था ठरवली आहे. या संस्थेमार्फतच क्राउड फंडिंग केले जाईल. इतर कुठल्याही संघटनेला क्राउड फंडिंगचा अधिकार वंचित बहुजन आघाडीने दिलेला नाही.