मुंबई: देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. गेले तीन चार दिवसापासून पेट्रोल डिझेल चे दर स्थिर होते परंतु आज पुन्हा वाढ झाली आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 103.26 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 106.54 आणि 96.27 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दररोज 6 वाजता बदलतात किंमती
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.















