मुंबई : गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भरमसाट वाढल्या आहेत. यामुळे देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. दरम्यान, इंधनापासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर सलग ४० दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर जवळपास २५ राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी इंधनावरील व्हॅट कमी केला आहे. नुकताच राजस्थान आणि दिल्ली या राज्यांनी व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात अजूनही राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात केलेली नाही. त्यामुळे इंधन अजूनही महागच आहे.
आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.४३ रुपये असून कोलकात्यात डिझेलचा भाव ८९.७९ रुपये कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे.















