Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुण्यात शनिवारी १६ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन ; खासदार शरद पवार, आमदार श्रीकांत भारतीय, छत्रपती संभाजी महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती

najarkaid live by najarkaid live
March 14, 2024
in राज्य
0
पुण्यात शनिवारी १६ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन
ADVERTISEMENT

Spread the love

पुण्यात शनिवारी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अधिवेशन

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार उद्घाटन
– खासदार शरद पवार, आमदार श्रीकांत भारतीय, छत्रपती संभाजी महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती.

पुणे : (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे शनिवारी दि.१६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील चिंचवड येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असून हे अधिवेशनाचे
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई च्या वार्षिक अधिवेशनत सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संभाजी महाराज, आमदार श्रीकांत भारतीय यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, आमदार श्रीमती अश्‍विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार उषा खापरे, बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, राजकीय विश्‍लेषक उदय निरगुडकर, पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, शिवसेना उबाठा गटाचे राज्य संघटक गोविंदराव घोळवे,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारच्या सत्रात ‘अमृतकाळातील माध्यम स्वातंत्र्य, भविष्य आणि पत्रकारितेतील राम’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात ज्येष्ठ लेखक अरविंद जगताप, ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, महेश म्हात्रे, संजय आवटे, मंदार फणसे, सम्राट फडणीस, आशिष जाधव सहभागी होणार आहेत.
सायंकाकाळच्या सत्रात ४ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय देऊन सन्मानित केले जाणार आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, आमदार बच्चूभाऊ कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, मनसे नेते अनिल शिदोरे, पत्रकार संघाच्या डिजीटल मीडियाचे युवा प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ भोकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी १६ मार्च रोजी आहेर गार्डन (व्हिआयपी बँक्वेट हॉल), चिंचवड येथे होणाऱ्या पत्रकार संघाच्या अधिवेशनात संपूर्ण राज्यातील शहरी, ग्रामीण पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वासराव आरोटे, उपाध्यक्ष नितीन शिंदे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पराग कुंकुलोळ, उपाध्यक्ष अतुल क्षीरसागर, महादेव मासाळ, सचिव जमीर सय्यद, कार्याध्यक्ष औदुंबर पाडूळे, खजिनदार मिलींद संधान,संजय माने, योगेश गाडगे, विजय जगदाळे, विकास शिंदे, बेलाजी पात्रे, प्रमोद सस्ते, प्रसाद वडघुले, सागर झगडे, सुनील बेणके, संजय भेंडे, संदीप सोनार, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी तसेच संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शांताराम मगर, जालन्याचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, परभणीचे जिल्हाध्यक्ष विलास चव्हाण, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर,नांदेडचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, लातूरचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे,धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील आदींनी केले आहे.

पुण्यातील राज्य अधिवेशन ऐतिहासिक होणार: वसंत मुंडे

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे शनिवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या अधिवेशनात पत्रकार आणि
पत्रकरितेबद्दल दोन सत्रांत विचारमंथन होणार आहे. राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचा गौरव सोहळा होणार आहे, हे राज्य अधिवेशन
ऐतिहासिक होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केला.

.
या दिग्गजांचा होणार यथोचित सन्मान

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनात पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल अनेक दिग्गज पत्रकारांचा सन्मान होणार आहे. जिवन गौरव पुरस्कार दैनिक लोकसत्ता चे पुणे आवृत्तीचे संपादक मुकुंद संगोराम तर दीपस्तंभ पुरस्कार लोकमतचे यदु जोशी यांना आणि विवेकवादी पत्रकारिता पुरस्कार हिना कौसर खान यांना देऊन गौरव करण्यात येणार आहे.
आश्वासक पत्रकारिता पुरस्कार रवींद्र आंबेकर, उत्कृष्ट पत्रकारिता दिनेश केळूसकर, युध्दवार्ता पत्रकारिता विनोद राऊत, आरोग्य पत्रकारिता संतोष आंधळे, अभिव्यक्ती पत्रकारिता सचिन चपळगावकर, कृषि पत्रकारिता विनोद इंगोले, जिजाऊ पत्रकारिता सुमित्रा वसावे, सद्रक्षणाय पत्रकारिता वैभव सोनवणे, आदर्श पत्रकारिता प्रविण बिडवे, प्रेरणादायी पत्रकारिता सतिष नवले, एकलव्य पत्रकारिता प्रकाश बेळगोजी, शोध पत्रकारिता रोहित आठवले, उत्कृष्ट पत्रकारिता सागर आव्हाड, निर्भिड पत्रकारिता अमोल काकडे तसेच वाशिम पत्रकारिता निलेश सोमाणी, उत्कृष्ट संघटक दशरथ चव्हाण (नवी मुंबई), नयन मोंढे (अमरावती), नितीन शिंदे (ठाणे), महेश पानसे (नागपूर), रमजान मन्सुरी (गुजरात), शिवाजी नेहे (गोवा), राजश्री चौधरी (दिल्ली), किशोर रायसाकडा (जळगाव), रोहिदास गाडगे (पुणे ग्रामीण), भूषण महाजन (जळगाव), शैलेश पालकर (रायगड), राजेंद्र कोरके (पंढरपूर), स्वामी शिरकूल (मुंबई), आरोग्य पत्रकारिता बाबा देशमाने, उपक्रमशील पत्रकारीता प्रभु गोरे (औरंगाबाद), वैभव स्वामी (बीड), आनंद शर्मा (नागपूर), प्रविण सपकाळे (जळगाव), प्रताप मेटकरी (सांगली), अमोल येलमार, प्रदीप शेंडे (नागपूर), आबा खवणेकर (सिंधुदूर्ग), पोपट गवांदे (नाशिक) यांचा गौरव होणार आहे.
…………,….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अष्टपैलू नेतृत्व संजुबापु एरंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
Next Post
मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us